आमदार देवराव भोंगळे यांचा जिवती तालुक्यातील ग्रामस्थांनी केला सत्कार
जिवती तालुक्यातील साडेआठ हजार हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील वनक्षेत्रात समाविष्ट नसलेले आणि निर्वणीकरण झालेले एकूण ८,६४९.८०९ हेक्टर क्षेत्र वनक्षेत्रातून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे कर्तबगार व संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने घेतला आहे.
त्यामुळे जिवती तालुक्यातील ११ गावांना मोठा दिलासा मिळाला असून याबाबतचे शासन पत्र नागपूर विभागीय आयुक्त आणि चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. या निर्णयामुळे आकांक्षित आणि दुर्गम असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वनहक्क जमिनीच्या बहुप्रलंबित प्रश्नावर आता तोडगा निघाला असून आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित असल्याने जिवती तालुक्यातील ग्रामस्थांनी राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आमदार देवराव भोंगळे यांचा सत्कार करीत त्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
यावेळी सत्कारप्रसंगी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, केशव पाटील गीरमाजी, राजेश राठोड, पुष्पा सोयम,अशपाक शेख, जमालू शेख, दिगंबर आंबरकर, चंद्रकांत घोडके,ममता जाधव,माधव पवार,तिरुपती कुंडगीर,भारत चव्हान,ज्ञानेश्वर गिरमाजी, सुबोध चिकटे, विठ्ठल चव्हाण आदी उपस्थित होते.