ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधीत तंबाखु व पान मसाला जप्त

एकूण 5 लाख 67 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी शासनाने प्रतिबंधीत केलेल्या तंबाखु व पान मसाला ची वाहतुक व विक्री करणा-या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने, दि. 04 सप्टेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे आरोपी नामे शुभम अरूणराव वैद्य, वय 31 वर्ष, रा. वार्ड नं. 02, भोजपुरा वार्ड मांडगाव, तह. समुद्रपुर याचेवर मौजा मांडगाव, लेंडी नाला पुलाजवळ, मांडगाव ते शेडगाव चौरस्ता रोडवर सापळा रचुन रेड केला असता, नमुद आरोपी हा त्याचे एका पांढ-या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ क्र. एम.एच. 31 ई.ए. 7680 मध्ये एकुण 25.205 किलोग्रॅम वजनाचा 52,965 रू. चा प्रतिबंधीत तंबाखु व पान मसाला साठ्याची वाहतुक करतांना रंगेहाथ मिळुन आल्याने, त्याचे ताब्यातुन सदरचा साठा वाहनासह जु.कि. 5,52,965 रू चा मुद्देमाल जप्त केला.

तसेच त्याच दिवशी दुस-या कार्यवाहीमध्ये आरोपी नामे पुरूषोत्तम वसंतराव भुते, वय 36 वर्ष, रा. वार्ड क्र 03 बॅक ऑफ बडोदा जवळ वाघोली, तह. हिंगणघाट, याचे राहते घरी रेड केला असता, त्याचे घरी 30 किलोग्रॅम वजनाचा कि. 15,000 रू चा शासनाने प्रतिबंधीत केलेला सुंगधीत तंबाखु चा साठा मिळुन आल्याने, तो सुध्दा जप्त केला. अशा दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमध्ये एकुण 55 किलो 205 ग्रॅम वजनाचा प्रतिबंधीत तंबाखु व पान मसाला चा साठा वाहनासह जु.कि. 5,67,965 रू चा मुद्देमाल जप्त केला असुन, दोन्ही आरोपीतांविरूध्द स्वतंत्र पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे भारतीय न्याय संहिता व अन्नसुरक्षा आणि मानके कायद्याचे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, रितेश गेटमे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये