तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटांमध्ये अल्फोंसा सीनियर सेकंडरी स्कूल (सावंगी मेघे) प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद वर्धा कार्यालय यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे वर्धा तालुकास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षीय वयोगटांमध्ये अल्फोंसा सीनियर सेकंडरी स्कूल (सावंगी मेघे) यांनी प्रथम येऊन जिल्ह्यात प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे सहभागी खेळाडूमध्ये तन्मय डोंगरे (गोल किपर) महम्मद शावेद (कप्तान) अन्मित पांडे (उप कप्तान), भार्गव कापसे, देवाशीस कुबडे, देव्यांक साटोणे , कुंज कुलसंगे, अवनीश फुलझेले, सुमित चुटे, साहिल पोलादे, विनीत चव्हाण, ऋषभ भस्मे, उज्वल कांबडी, अथर्वं कांबळे, आयुष नेवारे, सोहम गिरे, मंथन परतेकी स्पर्धेत विशेष ठसा उमटवला शाळेचे क्रिडा शिक्षक श्री संदीप खेर सर यांच्या नेतृत्वाखाली संघाने विजय मिळवला शाळेच्या प्राचार्य सिस्टर नव्या तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कडून संघाचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.