सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेद्वारे युवा मंच आणि महिला मंचची स्थापना

चांदा ब्लास्ट
दि. २/९/२०२५ ला सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था,चंद्रपुर तर्फे युवा मंच आणि महिला मंचची स्थापना करण्यात आली.
सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था मागील काही वर्षांपासून सामाजिक कार्य आणि लोककल्याण संबंधित उपक्रमांचे आयोजन करीत आहे. युवा वर्ग आणि महिला या संस्थेशि जुडावे आणि समाज कार्यात आपले योगदान द्यावे या उद्देशाने संस्थे तर्फे युवा मंच आणि महिला मंचाचे स्वतंत्र आयाम स्थापित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मार्फ़त संस्थेच्या व्हाट्सएप ग्रूपचे प्रारंभ आणि संस्थेला सेवा राशि समर्पित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. संस्थेशी जुडलेल्या सर्व युवक आणि महिला सदस्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले.
युवा आणि महिला मंच विविध क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याशी संबंधित प्रकल्प संपन्न करतील. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून युवा अधिवक्ता अॅड.आशिषजी मुंधडा उपस्थित होते. त्यांनी उपस्थित तरुणांना योग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सर्वोदय कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री.किशोर काबलिया उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष, युवा अधिवक्ता ॲड. हेमराज काबलिया, देवेंद्र काबलिया, श्रीमती हेमलताजी किशोरजी काबलिया यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात देवेंद्र काबलिया यांनी आभार मानले.