ताज्या घडामोडी
महानगरातील विविध सार्वजनिक मंडळांना भेट देवून हंसराज अहीर यांनी घेतले गणरायांचे दर्शन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देवून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी श्रींच्या मुर्तीचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी पुजा अर्चना केली. सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समृध्दी व निरामय आरोग्याची उधळण व्हावी अशी प्रार्थना श्रीचरणी केली.
गणेश उत्सव हा सर्वांच्या श्रध्देचा पवित्र उत्सव असल्याने या सणाचे पावित्र्य अबाधित राखतांनाच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा व पोलीस प्रशासनाद्वारे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यात सहभागी होवून हा उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन केले.