बोथली येथे व्यसनमुक्त व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
अष्टविनायक सार्वजनिक गणेश मंडळाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील बोथली खास येथे गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर येथील आदर्श अशा अष्टविनायक सार्वजनिक गणेश मंडळ यांनी मागील कित्येक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासतांना अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवून वाहवा मिळविली आहे.यावर्षी सुद्धा सदर गणेश मंडळाचे वतीने बोथलीचा राजा… व्यसनमुक्त गाव माझा..
या संकल्पनेतून बोथली येथील स्वयंप्रेरणेतून स्वतःला व्यसनमुक्त केलेल्या व्यक्तींचा तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा काल दि.०२/०९/२०२५ रोजी पार पाडून संपूर्ण जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आशिष बोरकर, ठाणेदार पो.स्टे.साकोली यांनी केले तर अध्यक्ष म्हणून रोहित बोम्मावार,संचालक चंद्रपूर जिल्हा मध्य.सह.बँक तथा अध्यक्ष साथ फाउंडेशन हे उपस्थित होते.तर या प्रसंगी प्रा.मिलिंद सुपले ब्रम्हपुरी उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी म्हणून सुशील नरेडडीवार सरपंच,विजय गड्डमवार उपसरपंच,ताराचंद खोब्रागडे पो.पा.,सचिन भैसारे नगरसेवक लाखनी,प्रकाश गड्डमवार अध्यक्ष जयकिसान पतसंस्था सावली,सौ.मीना आईंचवार मुख्याध्यापिका,अमोल मुप्पावार अध्यक्ष तंटा मुक्त समिती,यशवंत गोरडवार मुख्याध्यापक,तथा समस्त गावकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात गावातील पुढील व्यसनमुक्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.त्यामध्ये सुधाकर कस्तुरे,वासुदेव मुठ्ठावार ,महेश बद्दमवार,राजेंद्र गेडाम,जयेंद्र कुंभरे,करण गेडाम,संदीप कावळे,विक्की कुमरवार,भोजराज निरुडवार,परेश दळांजे,अशोक निरुडवार,प्रशांत दळांजे,अरविंद मुठ्ठावार,उत्तम दळांजे,दर्शन कोरेवार,कालिदास आत्राम,सुरज कारेवार,दिलीप गेडाम,रवींद्र कुंभरे,जितेंद्र मडावी,शामराव गेडाम,गजानन मुठावार,राजेंद्र निरुडवार,सुभाष निरुडवार,प्रवीण गुरनुले,या सर्वांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच गावातील इयत्ता दहावी-बारावी व शिष्यवृत्ती परीक्षा पात्र पुढील विद्यार्थ्यांना सुद्धा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.त्यामध्ये कु.डिम्पल मारोती येलटटीवार,कु.तनवी सुभाष बावणे,कु.वैष्णवी वासुदेव मुठ्ठावार,कु.मानवी सागर रामिडवार,कु.देवयानी ताराचंद खोब्रागडे,कुमार तन्मय किशोर वाळके,व इतर विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम करून आरोग्य विभागात नौकरी प्राप्त केलेला रोशन मधुकर वाळके यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे संचालन निलेश पुटकमवार यांनी तर प्रास्ताविक ताराचंद खोब्रागडे यांनी केले. बाळकृष्ण गोरडवार यांच्या आभार प्रदर्शनाने समस्थ ग्रामवासियांच्या उपस्थित कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्व मान्यवरांनी अष्टविनायक सार्वजनिक गणेश मंडळाची भरपूर स्तुती केली व मंडळाच्या पुढील वाटचाली साठी सुभेच्छा दिल्या.या आदर्श उपक्रमामुळे अष्टविनायक सार्वजनिक गणेश मंडळ बोथली यांची सर्वत्र कौतुकास्पद चर्चा होत आहे.