धूपदशमीच्या दिवशी युवतींनी साकारली भव्य आकर्षक रांगोळी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संपूर्ण भारतभर दिगंबर जैन समाजाचे वतीने दिनांक 28 ऑगस्ट 6 सप्टेंबर या कालावधीत पर्यूषण पर्व साजरा करण्यात येत आहे या दशलक्षण पर्व मध्ये उत्तम क्षमा, उत्तम मार्ग, उत्तम आर्जव,उत्तम शौच, उत्तम सत्य, उत्तम संयम, तप,उत्तम त्याग,उत्तम आंकीचन,ब्रह्मचर्य, अशा प्रकारे दहाही दिवशी भाद्रपद साजरा करण्यात येतो या दहाही दिवशी प्रत्येक दिगंबर जैन मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते.
शहरातील श्री पार्श्वनाथ काष्टासंघी दिगंबर जैन मंदिरात धुपदशमीच्या निमित्ताने युवतींनी एकत्र येत रांगोळीतून दशलक्षण पर्वा ओळख करून दिली त्यांनी साकारलेल्या भव्य आकर्षक रांगोळी पाहण्यासाठी सर्व जैन समाजातील महिला पुरुष युवक युवतींनी गर्दी केली होती रांगोळी साकारण्यासाठी हर्षिता गिरणीवाले, परि गिरीसा, प्रतिज्ञा महाजन, कोमल गिरीसा,पल्लवी गिरणीवाले, संस्कृती जैन, आस्था जैन, निधी खडकपूरकर, भाग्यश्री खवडे, मोहिनी महाजन यांनी अथक परिश्रम घेतले,