Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

वाघाला जेरबंद करण्यासाठी राळेगाव (रिठ)शिवारात लावला पिंजरा

पट्टेदार वाघाचा परिसरात वावर वाढला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

       भद्रावती तालुक्यातील राळेगाव रीठ व मणगाव शिवारात वाघाचा वावर वाढल्याने या परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या परिसरातील शेतीची कामे प्रभावित झाली आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून वनविभागाने या परिसरात पाहणी केली असता वाघाचे पगमार्क परिसरात आढळून आले.

यानंतर वनविभागाने या परिसरात कॅमेरे लावले असता कॅमेऱ्याच्या माध्यमातून परिसरात वाघाचे अस्तित्व आढळून आले. या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून राळेगाव शिवारात एक पिंजरा लावण्यात आला आहे. या पिंजऱ्यात वाघाला आमीष म्हणून कोंबडी ठेवण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून राळेगाव व मणगाव परिसरात एका वाघाचे दर्शन गावकऱ्यांना होत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरू आहे‌ मात्र वाघाच्या भीतीमुळे शेतातील कामे प्रभावित झाली असून शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहे. गावकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये