ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नशामुक्त जिल्हा करण्यासाठी प्रशासन तत्पर

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नार्को-कोऑर्डिनेशन समितीचा आढावा

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यात अंमली प्रदार्थाची वाहतूक, साठवण, विक्री व सेवन करण्यास पुर्णपणे प्रतिबंध आहे. गत काही दिवसांत अंमली पदार्थाचा साठा जप्त करून संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्हा नशामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को – कोऑर्डिनेशन समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच नशामुक्त चंद्रपूर जिल्हा करण्यासाठी ठोस पाऊले उचलली जात आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अंमली पदार्था मुळे मानवी आरोग्यावर होणा-या दुष्परिणामांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जनजागृतीपर मॅरेथॉन, रॅली, निबंध स्पर्धा, पथनाट्यातून तरुण पिढी तसेच महाविद्यालयीन युवकांना अवगत करावे. अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बंद असलेल्या कारखान्यांची पोलिसांच्या मदतीने तपासणी करावी. जिल्ह्यातील मेडीकल स्टोअर्स मधून अशा प्रकारची ड्रग्ज विक्री होत तर नाही, याबाबत खात्री करावी.

जिल्ह्यात तसेच आंतरराज्यीय सीमेवर शेतीमध्ये खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होणार नाही, याबाबत कृषी विभागाने सजग असावे. बाहेरून येणा-या पार्सलवर टपाल विभागाने लक्ष ठेवावे. तसेच खाजगी कुरीअरची पोलिस विभागाने तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये