जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे aayojan

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दि.8 मार्च 2026 ला जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी, आयु. नलिनी खेकडे मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून,आयु. उषा टोंगे मॅडम,आयु.शोभा भोयर मॅडम, आयु. प्रा. माधुरी उके मॅडम, आयु. संघा ताकसांडें,आयु. सरोज दुबे,आयु. निळाबाई निरंजने ,इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होत्या.
सुरवातीला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई,यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलीत करण्यात आले.त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त करून आपल्या हक्क अधिकारासाठी जागृत राहून वेळेवेळी संघटित राहून आवाज उठविण्याची गरज असल्याचे सांगितले.त्यानंतर,कार्यक्रमाच्या अध्यक्षा नलिनी खेकडे मॅडम यांच्या भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे संचालन आयु .रोशनी भगत,यांनी केले,प्रास्ताविक भाषण बेबी ताई वाघमारे यांनी केले.तर आभार प्रदर्शन ऋचा गावंडे यांनी केले.



