ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त मित्रांगन बहुउद्देशीय ग्रामीण विकास युवा मंच गडचांदूर तर्फे शिलाई मशीनचे वाटप 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कवठाळा येथे ग्रामपंचायत कवठाळा आणि मित्रांगन युवा मंचच्या वतीने महिला दिवस साजरा करण्यात आला, याप्रसंगी महिला मेळावा, महिलांचे संगीत, आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या, सोबतच मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास युवा मंच गडचांदूर तर्फे पल्लवी आनंदराव जाधव राहणार कावडगोंदी तालुका राजुरा, पोर्णिमा आतकारे राहणार कवठाळा तालुका कोरपना, अंजना पवार राहणार चिखलीपाटण तालुका जिवती या तीन गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवठाळा येथील सरपंच रूपालीताई बोबडे, होत्या उद्घाटक म्हणून श्री लाटकर साहेब शाखाधिकारी भारतीय स्टेट बँक शाखा कवठाळा, तर प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय संतोषजी राठोड साहेब अभियंता जी प चंद्रपूर,महिला व बालविकास अधिकारी सन्माननीय झाडे मॅडम, मित्रांगन युवा मंच च्या .सन्माननीय सचिव पूजा चव्हाण, इंजिनीयर वर्षाराणी राठोड मॅडम, रेखा शिंदेकर, ग्रामसेवक सन्माननीय नैताम साहेब, आणि गावातील शेकडो महिला या कार्यक्रमाला हजर होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये