ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिला सक्षमीकरणाच्या अनेक उपक्रमात वर्धा जिल्हा राज्यात अव्वल – पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल

उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस महिलांचा ‘पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या तर्फे मानसन्मान’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस महिलांना मिल्टन पाणी बाॅटल व उन्हाळ्यात गर्मी बचाव करण्यासाठी दुप्पटे वाटप

वर्धा : वर्धा जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. याच मातीने सिंधुताई सपकाळ यांच्यासारखी थोर समाजसेविका देशाला दिली. महिला भगिनी आणि महिला पोलिस सेविकांच्या रक्तातच माणुसकी आणि सेवेचा वारसा आहे. म्हणून पोलिस विभागाच्या पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी महिला सक्षमीकरणाच्या अनेक निर्देशकात वर्धा जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, असे वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वर्धा पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस वाहतूक शाखेच्या कार्यालयात वर्धा येथे महिला पोलिस कर्मचारी कॉन्स्टेबल यांना पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या हस्ते पोलिस महिला अंमलदार ज्योत्स्ना मेश्राम महिला पोलिस शिपाई प्रज्ञा भानारकर महिला पोलिस शिपाई चंदा हाडके महिला पोलिस हवालदार रोशनी कौरती महिला पोलिस शिपाई अंजू गजबे महिला पोलिस शिपाई लक्ष्मी कश्यप महिला पोलिस शिपाई प्रमोदनी ढोडरमल यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व मिल्टन पाणी बाॅटल व उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी दुप्पटे आणि मिठाई वाटप करून अशा प्रकारे वर्धा वाहतूक शाखेच्या जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये