दारू पिऊन दारूच्या नशेत वाहन चालवीणारे चालकवर गुन्हा दाखल
मोटार सायकल जप्त वाहतूक नियंत्रण शाखेची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 08/03/26 रोजी बस स्टॉप परिसरात संध्याकाळी 6 वा दरम्यान वाहतूक अंमलदार मार्शल एक ASI संजय भांडेकर, प्रदीप कोहळे व पो हवा आशिष देशमुख, चालक स्वप्नील तांबखे पीएसआय लगड साहेब यांच्या मार्गदर्शनात आरोपी साकिब रसूल शेख पिंपरी झोपडपत्ती वर्धा वय 24 वर्ष राहणार वर्धा हा त्याची मोटर सायकल mh 32 BA 2361 ही अति वेगाणे वाहन चालवीतना दिसून आला याला चेक केले असता त्याचा दारू पिल्याचा वास आला त्याची मेडिकल तपासनी केली असता त्याच्या रक्तात 251 mg अल्कोहोल चे प्रमाण मिळून आले व तो दारूच्या नशेत मिळून आला असून त्यावरून वरील चालक विरुद्ध कलम 185, मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला तसेच लायसन नसल्यामुळे 3/181 गुन्हा दाखल करण्यात आला वाहतूक नियंत्रण शाखा वर्धा यांनि ही कारवाई. आज रोजी बस्टॅन्ड जवळ केली आहे. व सदर वाहन मोटार सायकल नंबर mh 32 BA 2361 हे सुद्धा जप्त केलेले आहे.
तरी सर्व चालकांना आवाहान आहे कि आपले वाहन दारू पिऊन चालवू नये, सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेले आहे.



