ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदार यादी प्रसिद्ध; हरकती असल्यास नागरिकांनी नोंदवाव्यात

काँग्रेस तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे यांचे कोरपणा तालुक्यातील नागरिकांना आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा :_ तालुक्यातील मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीमध्ये कोणाचे नाव चुकीचे असल्यास, नाव वगळले गेले असल्यास अथवा अन्य कोणतीही त्रुटी आढळून आल्यास संबंधित नागरिकांनी वेळेत हरकत नोंदवावी, असे आवाहन काँग्रेसचे कोरपणा तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे यांनी केले आहे.

मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, तसेच नाव, पत्ता व इतर तपशील योग्य आहेत की नाही, याची खात्री करावी. यादीमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित प्रशासनाकडे आवश्यक कागदपत्रांसह हरकत अथवा दुरुस्ती अर्ज दाखल करावा.

“एकही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, तसेच मतदार यादीतील त्रुटी वेळेत दूर व्हाव्यात, यासाठी नागरिकांनी जागरूक राहून आपली हरकत नोंदवावी,” असे उत्तमराव पेचे यांनी सांगितले.

कोरपणा तालुक्यातील सर्व नागरिकांनी मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास वेळेत हरकत नोंदवावी, असेही त्यांनी आवाहन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये