ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणपती विसर्जनासाठी आलेल्या विदेशी दारूसाठा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कडून जप्त

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 21/9/2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदार यांना मुखबीर कडून माहिती मिळाली की ईसम नामे सागर मौर्य राहणार गणेशनगर वर्धा हा त्यांचा साथीदारासह नागपूर जिल्ह्यातून विदेशी दारू व बियर दारूचा माल घेऊन ट्रॅव्हल्स पॉईंट वसंत टाॅकिज जवळ वर्धा येथे येत आहे अशी माहिती मिळून आल्याने पंच व पोलीस स्टाॅफसह बच्छराज जीन ट्रॅव्हल्स पॉईट वर्धा येथे सापळा रचून इसम नामे (1) सागर राजेन्द्र मौर्य वय 29 वर्ष राहणार भगवान नगर नागपूर हल्ली मुक्काम गणेश नगर बोरगाव मेघे वर्धा (2) अभिनव नरेंद्र सहारे वय 26 वर्ष राहणार मोठ्या विहिरीजवळ स्टेशनफैल तहसील जिल्हा वर्धा यांना ताब्यात घेऊन त्याचे जवळील दोन मोठ्या बॅग व हातात दोन कापडी पिशव्याची पाहणी केली असता त्यामध्ये (1) ऑफिसर चॉईस कंपनीच्या 180 एम एल च्या विदेशी दारूच्या भरलेल्या 36 शिश्या (2) ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीच्या 180 एम एल च्या विदेशी दारूने भरलेल्या 60 सीलबंद शिश्या (3) मॅजिक मुमेट जामुन कंपनीच्या 180 एम एल च्या विदेशी दारूच्या 25 सीलबंद शिश्या (4) रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 एम एल च्या विदेशी दारूने भरलेल्या 70 सीलबंद शिश्या (5) सहयाद्री गोल्ड कंपनीच्या 180 एम एल च्या विदेशी दारूने भरलेल्या 10 सीलबंद शिश्या (6) ग्रॅन्ड मास्टर मिलन कंपनीच्या 180 एम एल च्या विदेशी दारूने भरलेल्या 24 शिश्या (7) मास्टर डि लाईट कंपनीच्या 180 एम एल च्या विदेशी दारूने भरलेल्या 07 शिश्या (8) रॉयल चॅलेंज कंपनीच्या 180 एम एल च्या विदेशी दारूने भरलेल्या 05 सीलबंद शिश्या (9) कासबर्ग कंपनीच्या 500 एम एल च्या टिनाचे 24 सीलबंद कॅन (10) टुबर्ग कंपनीच्या 500 एम एल च्या टिनाचे 42 सीलबंद कॅन (11) बडवायजर कंपनीच्या 500 एम एल च्या टिनाचे 18 सीलबंद कॅन असा जुमला किंमत 1,20,100/- रुपये अवैधरित्या मिळून आल्याने जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आला.

सदर आरोपीतानां विदेशी दारू बद्दल विचारपूस केली असता सदर विदेशी दारूचा माल हा सिताबर्डी नागपूर येथील रतूल वाईन शॉप मधील मॅनेजर यांचे कडून विकत आणल्याचे माहिती दिल्याने तीनही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून कलम 65 (ई) 77 (अ) 83 मदाका गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करत आहेत सदरची हि कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक वर्धा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक परवेझ खॉन पोलीस अंमलदार गजानन लामसे संजय बोगा अरविंद घुगे पवन निलेकर समीर शेख रविकिरण मून यांनी केलेली आहे…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये