विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन समाजाच्या प्रगतीची कास धरावी – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार
सावली येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण

चांदा ब्लास्ट
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उच्चशिक्षित होणे काळाची गरज असून शिक्षणाच्या बळावरच समाजाची व आपल्या कुटुंबाची प्रगती साधता येते. माझ्या मतदार संघातील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रशासकीय सेवेत यशाचे शिखर गाठावे या हेतूनेच मी पुढाकार घेऊन सामान्य ज्ञान स्पर्धेचे, तसेच स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन करणारी पुस्तके वितरण करीत आहे. आपण या संधीचे सोने करीत भविष्यात उच्चशिक्षित होऊन समाजाच्या प्रगतीची कास धरावी असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले ते सावली येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण सोहळ्या प्रसंगी अध्यक म्हणून बोलत होते.
आयोजित सोहळ्यास प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश चिटणुरवार,माजी जि.प.सदस्य ॲड.राम मेश्राम,माजी तालुका अध्यक्ष बंडू बोरकुटे,तालुका अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर, सावली नगराध्यक्ष साधना वाढई,शहर अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,माजी प.स.सभापती राकेश गड्डमवार,माजी प.स.सभापती विजय कोरेवार,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू ठाकरे,माजी उपसभापती दिवाकर भांडेकर,युवक तालुका अध्यक्ष किशोर कारडे,महिला शहर अध्यक्ष भारती चौधरी यांचेसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, बहुजन समाजाला आरक्षणाच्या सुविधां पासून वंचित ठेवण्यासाठी भांडणे लावण्याचा व जाती जातीत विभागण्याचा कटकारस्थानाचा गोरखधंदा सत्ताधाऱ्यांनी अवलंबला आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊन महाज्योती अंतर्गत एकट्या मराठा समाजाला 13500 कोटी व 374 जातींचा समावेश असलेल्या ओबीसी समाजाला केवळ 500 कोटी अशी सावत्र पणाची वागणूक सरकार देत आहे. आज आपण जागृत झालो नाही तर भविष्यातील आपली पुढील पिढी यांचे भवितव्य धोक्यात गेल्या शिवाय राहणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले. म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत यशाचे शिखर गाठले व आपल्या समाजाला न्याय हक्क व प्रगतीचा मार्ग मिळवून द्यावा असे आवाहन ही राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना केले.
यानंतर नुकत्याच पार पडलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोबतच सावली तालुक्यातील होतकरू व शिक्षणार्थी 500 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे यांनी आ. विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक कार्याचा आढावा उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचे संचालन चंचल रोहनकर यांनी तर आभार कुणाल ताजने यांनी मानले.कार्यक्रमाकरिता सावली तालुक्यातील व परिसरातील शेकडो विद्यार्थी, काँग्रेस पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.