ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्यापासून भिवकुंड येथे अखंड ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन सोहळा

चांदा ब्लास्ट

 चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिवकुंड येथे मागील वीस वर्षापासून ॐ डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन सोहळा आयोजित करण्यात येत असते. यावर्षी सुद्धा सोमवार दिनांक ९ मार्च २०२६ पासून ते सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन सोहळा संपन्न होत आहे. ग्रंथराज ह. भ .प. श्री जीवन महाराज थेरे (आळंदी देवाची)कार्यक्रमातील प्रवचनकार यांच्या हस्ते काकडा व हरीपाठ संच व संगीतमय साथ तसेच काल्याचे किर्तन सोमवार दिनांक १६ मार्च सकाळी दहा वाजता यांच्या हस्ते होणार आहे. सोमवार ९ मार्चला सकाळी साडेसहा वाजता घटस्थापना, प्रार्थना व हरिपाठ, दिप उत्सव व दिंडी सोहळा, भजन मंडळ, संत दर्शन, इत्यादी दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

घटस्थापना किशोर महाराज जामुनकर, डिमेशराव गाठे यांच्या हस्ते होणार असून हवन व झेंडा पूजन श्री जोशी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.

 दररोज सकाळी व सायंकाळी ज्ञान व प्रार्थना ह भ प पुंडलिक महाराज इखार, गजानन फाले, नथ्थुजी सातपैसे यांच्या शुभहस्ते होणार आहेत. सात दिवस वेगवेगळे प्रवचनकार प्रवचन करणार आहेत.

प्रत्येक दिवशी सकाळी अल्पोहार आणि एकादशीचा फराळ , तसंच अन्नदात्यांकडून दर दिवशी आपले सहकार्याचे योगदान असणार आहेत.या कार्यक्रमात आमडी (बे.), खेक, कोरा, पेरखेडा, दसोडा, धामनगांव, सिल्ली, रंगाबोडी, खानगांव, माकोना, वाहनगांव, खापरी बोधली, खडसंगी, सावरी व परिसरातील समस्त जनता जनार्धन मंडळी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ॐ डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदीर समिती, भिवकुंड यांच्याकडून करण्यात येत आहे.

कथा सप्ताहात येताना नागरिकांना नशापाणी करुन येण्यास सक्त मनाई आहे. असे मंदिर समितीच्या वतीने कळविण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये