ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य सरकारने पूरग्रस्त व अतिवृष्टी बाधित शेतक-यांसाठी जाहिर केलेल्या फसव्या अनुदान परिपत्रकाची शेतकरी संघटना होळी करणार

चांदा ब्लास्ट

         शेतकरी संघटनेने दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यभर जिल्हा कचेरीसमोर व काही तालुक्यात धरणे आंदोलन करून हेक्‍टरी किमान ५० हजार रुपयांची मदत पुरग्रस्त व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी करावी तसेच राज्य शासनाने सत्तेत येण्यापूर्वी त्यांच्या जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांची सर्व पीककर्ज संपवावी व सातबारा कोरा करावा इत्यादी मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे असे कारण दाखवून राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून बाधित शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली. लोककल्याणकारी राज्यात सुरू असलेले शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबविण्याचे दृष्टीने सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे, नदीकाठी सहा पेक्षा जास्त वेळेला महापूर आल्यामुळे किनारपट्टीवरील पिकेच बुडाली नाही तर जमीनही खरडून गेली आहे.

अशा शेतकऱ्यांना जमिनीचा स्तर पूर्ववत करण्यासाठी मनरेगा मधून तीन लाखापर्यंत कामे करू असे म्हंटले आहे. त्याचा शेतकऱ्यांना काहीही प्रत्यक्ष लाभ होणार नाही, कारण ही योजना व या योजनेतील कामे सुरूच आहेत. अशा स्थितीमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेण्याकरिता व कुटुंब सावरण्याकरिता भरीव मदतीची गरज होती आणि लोककल्याणकारी राज्य म्हणून शेतकऱ्यांची ही अपेक्षा होती, परंतु त्यांचा अपेक्षाभंग झाला असून मदतीसाठी तथाकथित काढलेले अनुदानाचे परिपत्रक (जीआर) फसवा असल्यामुळे त्याचा निषेध म्हणून आम्ही जगावे कसे ही भूमिका ठाम मांडत शेतकरी संघटनेने महाराष्ट्रभर जिल्हा कचेरी समोर दिनांक १६ आक्टोंंबर ला दुपारी १२ वाजता या फसव्या अनुदान परिपत्रकाची होळी करण्याचे आंदोलन जाहीर केले आहे.

           चंद्रपूर येथे दिनांक १६ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष स्वभाप निळकंठराव कोरांगे प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष ॲड. दीपक चटप, जिल्हा उपाध्यक्ष सुनील बावणे, सुधीर सातपुते, ॲड..शरद कारेकर, शेषराव बोंडे, ॲड. प्रफुल्ल आस्वले, प्रभाकर ढवस, शब्बीरभाई जागीरदार, देविदास वारे, व्यंकटेश मल्लेलवार, पोर्णिमा निरंजने, प्रा. जोस्ना मोहितकर, प्रा.सतीश मोहितकर, प्रा. निळकंठ गौरकार, दादा नवलाखे, रवींद्र गोखरे, कपिल इद्दे, रामकृष्ण सागळे, ॲड.श्रीनिवास मुसळे, शालिक माऊलीकर, मदन खामनकर, नरेश सातपुते, गणेश कदम, कवडू बुटले, रमेश नळे, प्रा. रामभाऊ पारखी, दिलीप देठे इत्यादींनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये