बेलदार समाजातर्फे कोजागिरी व गुणवंतांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बेलदार समाजसेवा कल्याण समिती बल्लारपूर तर्फे समाज बांधवांचा कोजागिरी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम बालाजी सभागृह येथे दि. ११/१०/२०२५ ला पार पडला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक श्री.अशोक नायडू, समितीचे अध्यक्ष श्री.श्रीनिवास बुगावार ,उपाध्यक्ष श्री. उमेश कोलावार, सचिव श्री. सुनील बोपनवार,सहसचिव श्री. विलास बेझलवार,श्री सुभाष गुज्जनवार,एड. श्री किशोर कुसलवार प्राध्यापक श्री नागेश गांडलेवार श्री रमेश नायडू आदींची मंचावर उपस्थिती होती.
मान्यवरा तर्फे बेलदार समाजाचे प्रेरणास्थान माजी मुख्यमंत्री स्व.श्री.मा.सा. कन्नमवार यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली
मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बेंलदार समाजाचे अल्प आरक्षण व शैक्षणिक व सामाजिक स्थिती यावर सुनील बोपनवार व प्रा.नागेश गांडलेवार यांनी मार्गदर्शन केले बेलदार समाजातून प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी चि. शाश्वत सतीश कस्तुरवार,चि. अथांश श्रीनिवास बुगावार, चि. वंश विजय झिलकरवार (दहावी) कु.श्रद्धा नागेश नायडू ,कु. सृष्टी ईश्वर नेरडवार ,कु. आर्या कमलेश बुगावार (बारावी )कु. अनुश्री उमेश कोलावार (डिप्लोमा) कु.साक्षी राजेश कोमटवार (आयटी इंजि.) कु.भाग्यश्री सुरेश नायडू (एम एस सी) या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमात कोण बनेगा कोजागिरी विजेता,संगीत खुर्ची, कपल गेम ,वन मिनिट शो, सजावटी वस्तूचे प्रदर्शन व तंबोला कार्यक्रम घेऊन उपस्थित आमचे मनोरंजन व पुरस्कार करण्यात आले सर्व स्पर्धाचे संचालन सौ•सवीता बोपनवार रेखा बेझलवार ज्योती तोटेवार यानी केले
प्रास्ताविक व संचालन ईश्वर नेरडवार व आभार प्रदर्शन श्रीनिवास बुगावार यांनी केले.
समितीतर्फे भोजन व दुग्धप्राशनाची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव श्री सतीश कस्तुरवार, सुरेश नायडू, नागेश नायडू,विजय दिकोंडवार, डॉ,सुनील कुल्दीवार ,किरीट सत्यनारायण, राजेश मारशेट्टीवार, राजेश कोमटवार, परिस महाजनवार, रमेश कोलावार, सदानंद बुधार्थी, राजन कोंडावार,डॉ.आशिष गुज्जनवार, सुधीर कस्तुरवार, राजेश गाडेवार,दिनेश कोलावार रमेश उद्धरवार,राकेश अडगुरवार, राकेश अनमुलवार, गणेश झीलकरवार, प्रतीक बेजलवार,शंकरराव पुलगमवार लक्ष्मण देशवेंनी,सौ. प्रिया बुग्गावार, भारती मारशेट्टीवार कविता बोपनवार,मनीषा कोलावार, छबुताई बेजलवार, बेबीताई गंगशेट्टीवार, सुवर्णा नायडू ,सुनीता नायडू,उमा नायडू, शिल्पा नायडू प्रचेता बोपनवार,रजनी झिलकारवार, दीपावली दिकोंडवार,संध्या नेरडवार,प्रेरणा त्रिपतीवार, राणी गादेवार,अमृता अडगुरवार, ज्योती उध्दरवार, हेमवती कोमटवार,सुरेखा पिरसिंगलवार, अनिता कोलावार,शितल कोलावार व असंख्य समाज बांधवांची कार्यक्रमाला उपस्थिती होती