देऊळगाव राजा येथे अमली पदार्थ;सायबर विषयक जनजागृती मोहीम;व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अमली पदार्थांच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी आणि युवकांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नागरिक, विद्यार्थी व पालकांना व्यसनाचे दुष्परिणाम आणि कायदेशीर परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात न्यायाधीश मा.महेश जी भरड यांनी ही उपस्थिती दर्शविली. यावेळी अमली पदार्थ बाबत जनजागृती करत मार्गदर्शन करत “अमली पदार्थ हे केवळ शरीरासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी घातक आहेत. व्यसनामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आणि तरुणाईचा अपमान होतो. त्यामुळे प्रत्येकाने या विषयी जागरूक राहून समाजातून व्यसनमुक्तीचा संदेश द्यावा.” असे आवाहन करण्यात आले.मोहिमेच्या दरम्यान बस स्थानक चौक ,श्री बालाजी संस्थान समोर,तसेच सार्वजनिक ठिकाणे जनजागृती फलक, बॅनर, पोस्टर तसेच रॅलीद्वारे संदेश देण्यात आले.पोलीस कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, शिक्षक व स्थानिक नागरिक यांनी उत्साहाने सहभाग घेतला.या मोहिमेचा उद्देश समाजात “अमली पदार्थांना नाही, जीवनाला होकार” हा संदेश रुजवणे हा असून, भविष्यात अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करून तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
तसेच न्यायाधीश मा.महेश जी भरड यांच्या विशेष उपस्थिती मध्ये विधी सेवा समिती च्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर ही घेण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम,वकील संघ चे अध्यक्ष एड. किशोर सरदार,एड.प्रदीप घेवंदे, अर्चना घेवंदे मॅडम,एड आश्विनी सावजी मॅडम, एड वाघ,एड अनिल शेळके,एड राहुल देव ,सय्यद सलमान सह युवक, युवती, वकील मंडळी व पोलीस कर्मचारी इतर मान्यवर उपस्थित होते.
सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, यासाठी पोलीस स्टेशनच्या वतीने सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ऑनलाईन फसवणूक, OTP शेअरिंग, बनावट लिंक व बँक फसवणुकीपासून बचावाचे मार्ग सांगण्यात आले.
“अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नका” असा संदेश देत नागरिकांना जागरूक करण्यात आले.