ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील यात्रेत बिना सुरक्षा चालविल्या जात आहेत आकाश पाळणे

कारवाई करण्याची छावा संघटनेची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथे बालाजी महाराज यात्रा सुरू झाली असून विविध मनोरंजन साधने रहाट पाळणे, झोपाळे, ब्रेक डान्स, मिक्की माउस खेळणी, उभारण्यात आली आहे समानवी जिवीत हानी होऊ नये यासाठी छावा संघटनेने यात्रेत वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांची संबंधित विभागामार्फत तपासणी करूनच साधने सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते.

मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहेत असा आरोप छावा संघटना करत आहे.या सदनासाठी आवश्यक असलेले परवाने, फायर एन ओ सी, यांत्रिक तपासणी प्रमाणपत्र, सार्वजनिक दायित्व विमा, वीज विभागाची परवानगी घेण्यात आली नाही त्यामुळे नागरिकाच्या जीवितास व सुरक्षेला धोका निर्माण झाला असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रशासनाने यात्रेत उभारलेल्या सर्व मनोरंजन साधनांची तत्काळ तपासणी करून परवाना व सुरक्षा प्रमाणपत्र ची तपासणी करावी. बिना परवाना सुरू असलेली साधने तात्काळ बंद करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी यात्रा स्थळी अग्निशमन दल, आरोग्य पथक आणि पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, प्रशासनाने कारवाई केली नाही तर छावा संघटना आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष राजे जाधव यांनी म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा, मुख्याधिकारी, नगर परिषद देऊळगाव राजा, तहसीलदार देऊळगाव राजा, पोलिस निरीक्षक, देऊळगाव राजा, कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी देऊळगाव राजा यांना देण्यात आलेल्या आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये