लोणीच्या गंगामाता देवस्थानात भाविकाची अलोट गर्दी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील काही अंतरावर असलेला गाव लोणी येथील गंगामाता देवस्थानात जीवती तालुक्यातील माराई पाटण यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होते आहे. मराठवाडा, तेलंगणा, यवतमाळ जिल्ह्यातून व इतर जिल्ह्यातून येणारे पोहे मोठ्या श्रद्धेने माराई पाटण मातेची मोठी बहीण -असलेल्या लोणी येथील गंगा मातेचे सर्वप्रथम दर्शन घेऊन मराई पाटणकडे प्रस्थान करतात.
एका पोह्यातील माराई पाटण मातेच्या माहिती कथनानुसार माराई पाटण मातेला सात बहिणी व एक बंधू आहे. यातील लोणी येथील गंगामाता सर्वात मोठी तर मराई पाटण येथील माता सर्वात धाकटी बहीण होय. गेल्या अनादी काळापासून श्रद्धेने या ठिकाणी भावी येत असतात. त्यामुळे या भागाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. होळी पंचमीदरम्यान होणाऱ्या यात्रेत
भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने कोरपना ते माराई पाटण मार्गावर वाहनांची वर्दळ अधिक दिसून येते. लोणी येथील गंगामाता देवस्थानात या यात्रेनिमित्त आकर्षक प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी दर्शन घेण्यासाठी पोहे बघण्यासाठी परिसरातील नागरिक ही मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येते. तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी कोरपना तालुक्यातील लोणी येथील गंगामाता देवस्थान हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थान आहे.
मात्र, या देवस्थानाला अद्यापही शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला नाही. या तीर्थक्षेत्राचा विकास होण्यासाठी शासनाने देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विकास साधावा, अशी मागणी भाविकाकडून व्यक्त होत आहे



