ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

'शिवगाथा' महानाट्याने जिंकली नागरिकांची मने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी : स्थानिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने काल शुक्रवार, ६ मार्च रोजी ब्रह्मपुरी शहरात पारंपारिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित पालखी सोहळा आणि ‘शिवगाथा’ महानाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

*भव्य पालखी सोहळा*

दुपारी ३ वाजता भवानीमाता मंदिर येथून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा गजर पाहायला मिळाला. यामध्ये: ढोलताशा पथक, वारकरी दिंडी आणि लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष आकर्षण नागपूर येथील संबळ कलावंत पथक, घोडे आणि रथासह ही पालखी शेष नगर येथील बारई कॉम्प्लेक्सपर्यंत काढण्यात आली.

आदल्या दिवशी भवानी मातेच्या मंदिरात आई भवानी चरणी अभिषेक व गोंधळ घालण्यात आला शहरातील 18 भजन मंडळींनी गोंधळाचे सादरीकरण केले.

पालखी सोहळ्यानंतर

संध्याकाळी ७ वाजता नागपूर रोडवरील बारई कॉम्प्लेक्समागील मैदानात ‘शिवगाथा महानाट्य’ सादर करण्यात आले. भारतीय शिक्षण संस्था, नवरगाव येथील १५० कलाकारांनी आपल्या बहारदार अभिनयातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास जिवंत केला. हे महानाट्य पाहण्यासाठी ब्रह्मपुरी व परिसरातील शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये