गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली शारीरिक शिक्षण व क्रीड़ा शिक्षक संघटने तर्फे विविध मागण्यांचे कुलगुरूना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली शारीरिक शिक्षण आणि क्रीड़ा शिक्षक संघटनेने यांनी दिनांक १० ऑक्टोबर २०२५ खेळाडूंच्या आणि शारीरिक शिक्षण संचालकांच्या समस्या बाबतत कुलगुरूना निवेदन देण्यात आले. तसेच हे निवेदन मा. राज्यपाल (कुलपति), मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, मा. राज्य मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, शिक्षण संचालनालय पुणे, मा. सह संचालक उच्च शिक्षण नागपूर, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, मा. सीनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना प्रतिलिपि द्वारे देण्यात आले.
निवेदनात खेळाडूं चा भोजन भत्ता वाढविण्यात यावा, खेळाडूंना उत्तम दर्जाचे किट, ट्रॅक सुट देण्यात यावे, खेळाडूचे प्रशिक्षण शिबीर, खेळाडूंना स्पर्धेदरम्यान प्रवासात आरक्षित रेल्वे तिकीट मिळाले पाहिजे, सुरळीत क्रीड़ा स्पर्धा वेळापत्रक तसेच शारीरिक शिक्षण संशोधन केंद्र निर्माण करावे, उत्कृष्ठ खेळाडू, उत्कृष्ठ क्रीड़ा संचालक पुरस्कार देण्यात यावा, शारीरिक शिक्षण आणि खेळ हा विषय पदवी अभ्यासक्रमात द्यावा आशा मुख्य मागण्या निवेदनाद्वारे कुलगुरू यांना देण्यात आले आहे.
यावेळी गोंडवाना विद्यापीठ संलग्न शारिरीक शिक्षण व क्रीड़ा संचालक डॉ. ज्ञानेश्वर ठाकरे, डॉ. विशाल शिंदे, डॉ . मुरलीधर रुकमौडे, डॉ. संदीप मैड, डॉ. आनंद वानखेडे, प्रा. आशिष चहारे,डॉ. कुलदीप गोंड,डॉ.राजू चावके , डॉ राजेंद्र गोरे, डॉ. शैलेंद्र गिरीपुनजे , डॉ. संघपाल नारनवरे, डॉ श्याम कोरडे,डॉ. सत्यंदर सिंह, डॉ. मेडुकर, प्रा तानाजी बायसकर,डॉ. पैनकर, डॉ. संजय मुरकुटे, डॉ अतुल पारखी इत्यादी उपस्थित होते.