उद्या राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनीरिंगमध्ये “सन्मान… स्त्री कर्तृत्वाचा”

चांदा ब्लास्ट
आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे “सन्मान… स्त्री कर्तृत्वाचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता स्व. छोटुभाई पटेल सभागृह, आरसीईआरटी कॅम्पस, चंद्रपूर येथे पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरचे अध्यक्ष मा. विनोदजी दत्तात्रेय राहतील. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर वन अकादमीच्या उपसंचालक मा. अश्विनी जाधव, जिल्हा विशेष शाखा, चंद्रपूर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके राहणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एस.पी.एम.एस. संस्थेचे विश्वस्त रफीक अहमद, सचिव जयंत वेलंकीवार, कोषाध्यक्ष निनाद गड्डमवार तसेच विश्वस्त प्रशांत पोटदुखे यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असून, त्यामध्ये मा. परवीन पठाण, मा. छबुताई वैरागडे, मा. उषा अशोक बुक्कावार, मा. डॉ. संगीत पोटले, मा. मीनाक्षी वाळके आणि मा. वर्षा कोडापे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.



