ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव महीत साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठेंची जल्लोषात मिरवणूक

ब्रॉस बँडच्या जुगल बंदीत समाज बांधव मंत्रमुग्ध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस..! असे परिवर्तनाचे विचार साहित्यातून मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती उत्सवा निमित्त दि.5 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार मंच देऊळगांव महीच्या वतीने मानवी शरीराला घातक ठरणाऱ्या डिजेच्या धिंगाण्याला फाटा देऊन पारंपरिक वाद्य असलेल्या दोन ब्रॉस बँडच्या जुगलबंदीत देऊळगाव मही शहरातून भव्य- दिव्य मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीच्या प्रारंभपूर्वी अंखड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पपूजन अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सरस्वती ब्रॉस बँड गंगाचिंचोली (जालना) अंबिका ब्रॉस बँड अंत्री (ठाणे) यांच्या जुगलबंदीत अश्वरुढ रथात डॉ.अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार बंधू सतिष कायंदे,माजी अर्थ व बांधकाम सभापती रियाजखान पठाण, सभापती समाधान शिंगणे,दे. राजा कृ.बा. स.संचालक शंकरदादा शिंगणे, प्रा. कमलेश खिल्लारे,दे. राजा. ठाणेदार ब्रम्हा गिरी, युवानेते गजेंद्र शिंगणे,प्रभात खिल्लारे, सरपंच ज्योत्सना वसुदेव पाटील शिंगणे, पोलीस पाटील रंगनाथ शिंगणे,बि. एम. पठाण,अमोल इंगळे, रतन रेशवाल, अरविंद भैया शिंगणे,सुधीरअप्पा मुंगसे, माजी सरपंच प्रदीप हिवाळे,युवानेते संभाजीराजे शिंगणे,मन्नान पठाण,रामा म्हस्के,युवानेते गणेश सवडे, गजानन पवार, राजेश इंगळे,अनिल कांबळे,सुभाष शिंगणे,सुभाष इंगळे, दादाराव खार्डे, तंटामुक्ती अध्यक्ष भास्करअण्णा शिंगणे,तुळशीराम पंडित, कैलास राऊत, शेख. मुस्लिम, संदीप राऊत, अंनता इंगळे, गणेश शिंगणे, भरत शिंगणे,राजू शिंगणे,राम प-हाड, अमोल बोबडे, रवि जाधव, सय्यद सईद,भगवान खंदारे,किशोर कांबळे, श्रीकृष्ण शिंगणे, देविदास जाधव, डॉ. मनोहर जाधव,राजू कांबळे, सुनिल लोखंडे,राजू गोफणे, राजू नाडे, संजय हिवाळे, उमेश खरात, राम ससाणे, सूरज हनुमंते, देवानंद धोंगडे, अजय साबळे, गजानन पाटोळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर मिरवणूक यशस्वीतेसाठी साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा गजराबाई वाघमारे, उपाध्यक्ष रामदास साळवे, सचिव प्रदीप अवसरमोल, संतोष जाधव,किरण जोगदंड,हरीश वाघमारे, सुरेश वाघमारे, संदीप जोगदंड, हितेश वाघमारे,मनिष वाघमारे, संदीप खंदारे,जगदेव अंभोरे, रोहित जाधव,सोनु वाघमारे, प्रमोद जाधव,आदित्य वाघमारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील असंख्य समाज बांधव यांची लक्षनीय उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये