जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथे मोबाईल वरून विद्यार्थ्यांचे मतदान..!
लोकशाहीचा अद्वितीय प्रयोग _ साई करपते, मुख्यमंत्रीपदी विजयी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा चिखली बु केंद्र पाटण पं. स. जिवती येथे दिनांक 5 ऑगस्ट रोजी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मोबाईल वरील वोटिंग मशीन ॲप द्वारे मतदान करत लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेतला.
. संपूर्ण आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम अशा या चिखली बु गावातील शाळेत पाच गावचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वर्ग पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या या निवडणुकीत शाळेतील 133 विद्यार्थ्यापैकी 110 विद्यार्थ्यांनी व सहा शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये एकूण 20 उमेदवारांनी निवडणुकीत सहभाग घेतला होता. दोन दिवसाच्या प्रचारानंतर पारदर्शक, गुप्त मतदान पद्धतीने ही निवडणूक झाली.
. या निवडणुकीत साई करपते याला सर्वाधिक 43 मते मिळवून मुख्यमंत्री पद मिळाले.
तर निवडून आलेल्या मंत्र्यांमध्ये
ओम चव्हाण : उपमुख्यमंत्री
नव्या राठोड : सांस्कृतिक मंत्री
विराट कोहचाळे: क्रीडामंत्री
श्वेता राठोड : शिक्षण मंत्री
उमंग राठोड : शालेय पोषण आहार मंत्री
अवंती घायवणकर : अर्थमंत्रि
दित्या करपते : पर्यावरण मंत्री
. वरील सर्व नवयनियुक्त मंत्र्यांचा शपथविधी समारंभ संपन्न झाला. मुख्याध्यापक राजकुमार मून यांनी प्रत्येक मंत्र्याची कार्य समजून सांगितली. तसेच लोकशाही निवडणुकीतील कार्याची माहिती दिली.
या संपूर्ण उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार मून सहायक शिक्षक चव्हाण सर, पवार सर, वाकुडकर सर, बोबडे मॅडम, यांचे मोलाचे योगदान लाभले.
. या अभिनव ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा पारदर्शक व लोकशाही पद्धतीने अनुभव घेता आला. यामुळे शाळेबद्दल आत्मेता वाढली असून लोकशाही मूल्याची शिकवण मिळाली आहे.
राजकुमार मून, मुख्याध्यापक, चिखली बु