ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हापरिषद उच्चं प्रा. शाळा कुणाडा येथील शाळेची दुरावस्था

लहान मुलांच्या जीविताशी खेळण्याचा जिल्हापरिषद व वेकोली प्रशासनाचा प्रकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       कुणाडा गाव हे वेकोली चारगाव कुणाडा गाव हे पुनर्वसीत गाव आहे. सेकोली ने जिल्हा परिषद शाळेसाठी जागा दिली व इमारत बांधून दिले मात्र ती इमारत निकृष्ट दर्जाची असल्याने भिंतीना तडे जाऊन स्ल्याब सुद्धा गळत आहे. लहान मुले शाळेत बसू शकत नाही, ते तिथे सुरक्षित नसल्याने शिक्षकांना बाहेर झाडात शाळा भरवावी लागत आहे. टीनाचे शेड मध्ये आता शाळा भरविली जाते टीनाचे वरचे शेड खराब झाल्याने व आजू बाजूने टीना सडल्याने साप, विंचू शाळेत येतात गेल्या वर्षी तीन मुलांना विंचू चावला असुन वेळेवर उपचार झाल्याने अनर्थ टळला.

           शिक्षक व स्थानिक शाळा समितीने वरकोली प्रशासनाकडे व जिल्हापरिषद प्रशासनाकडे सन 2018 पासून तक्रारी केल्या परंतु वेकोली प्रशासन जिल्हापरिषद कडे व जिल्हापरिषद वेकोली कडे बोट दाखविण्याचे काम करीत असून दोन्ही विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.

       या शाळेत मुलांना बसण्यासाठी चांगली इमारत नाही, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, संडास बाथरूम नाही, किंवा चांगला रस्ता नाही, अशा परिस्थितीत शाळा सुरु आहे. देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन देशाला लाखो करोडो रुपयाचा किमती असलेल्या कोळसा खाणी साठी आपली जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या गरीब मुलांना अशा शाळेत जिवमुठीत घेऊन शिकावे लागते हे दुरदैव आहे.

दिनांक 26/07/2025 रोजी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यानी भेट देऊन शिक्षकांची व विध्यार्थ्यांना भेटून समस्या जाणून घेतल्या व फोन द्वारे सबेरिया म्यानेजर वेकोली चारगाव व शिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती यांचेशी संपर्क साधला व तात्काळ तोडगा काढून सुविधा पुरविण्याची मागणी केली.

शाळेसाठी नवीन इमारत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संडास बाथरूम, काँक्रिट रस्ता व तात्काळ कचरा सफाई करण्यात यावी अन्यथा वेकोली व जिल्हापरिषद प्रशासना विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये