विदर्भ विभागीय मच्छीमार सहकारी संघाच्या संचालक पदी भद्रावतीचे नंदू पढाल मताधिक्याने विजयी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघ मर्या. नागपूर च्या निवडणुकीत सर्वसाधारण प्रतिनिधी, अनुसूचीत जाती/जमाती प्रतिनीधी, महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी व भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातील सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधी साठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणुक नियम २०१४ च्या नियम ३२ प्रमाणे नमुद शनिवार दि.२६ जुलैला नागपूर येथे पार पडलेल्या संचालक पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत इतर मागासवर्गीय मच्छिमार प्रतिनिधी मतदार संघातील उमेदवार नरेंद्र उर्फ नंदू महादेव पढाल हे मताधिक्याने निवडूनआल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम रोकडे यांनी केली.
या निवडणुकीत त्यांनी २०३ मतांपैकी १२१ मते घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप पारीसे यांचा ३९ मतांनी पराभव केला. यात प्रतिस्पर्ध्यांना ८२ मते पडली तर २ मते अवैध ठरली. त्यांच्या या निवडीचे विदर्भ स्तरावर सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.