ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा वनसडी पिपर्डा जिवती रस्त्याचे डांबरीकरण करा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
राजुरा परसोडा राष्ट्रीय महामार्ग ३५३ बी वनसडी गावालगत दहा ते पंधरा गावाला तसेच जिवती तालुक्याशी जोडणाराहा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते मात्र ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडण्यात आला त्या ठिकाणी निरुंद व दोन वाहन निघू शकत नाही त्या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून अनेक मोटर सायकल धारक वाहन घसरून पडले आहे.
अनेकांना दुखापत झाली राष्ट्रीय महामार्गाच्या नाली बांधकाम त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधले असून त्या ठिकाणी भराई करून नालीसह रस्त्याची जोडणी करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे