ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
एलसीबीची कारवाई – गावठी कट्टा आणि काडतूस जप्त

चांदा ब्लास्ट
घुग्घुस :_ शहरात २६ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजता स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धाड टाकून एक बनावटी गावठी देशी कट्टा आणि एक काडतूस जप्त केले.
चंद्रपूर एलसीबीला घुग्घुस परिसरातील दोन आरोपींकडे बनावटी गावठी कट्टा आणि काडतूस असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने तत्काळ कारवाई करून आरोपींकडून कट्टा आणि काडतूस जप्त केले.
यानंतर दोन्ही आरोपींना घुग्घुस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.