सेवाभावी कार्यक्रमांनी सजला चंद्रपूरचा सेवा सप्ताह, ३५५ कार्यक्रमांचे नियोजन कौतुकास्पद– बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त आयोजित पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा संपन्न.

चांदा ब्लास्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरू केलेली जनसेवेची ही ३५५ कार्यक्रमाची मालिका कौतुकास्पद आहे. या उपक्रमांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचत आहे. मि आमदार असता पासून किशोर जोरगेवार हे आमचे मित्र असून ही मैत्री आज अधिक दृढ झाली आहे. कामाचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांना मार्गी लावणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांचे सामाजिक भान आणि नियोजनही पाहता आले असून सेवाभावी कार्यक्रमांनी चंद्रपूरचा सेवा सप्ताह सजला असल्याचे प्रतिपादन राज्याचे बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त बालाजी सभागृहात कार्यकर्ता मेळावा, रक्तदान शिबिर, मंडळ अध्यक्षांना संगणक वाटप. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नवनियुक्त पदाधिकारी आणि संचालकांचा सत्कार, आणि पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री भोसले बोलत होते.
या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, भाजप नेते अशोक जिवतोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, प्रकाश देवतळे, रघुवीर आहिर, दशरथसिंह ठाकूर, नामदेव डाहुले, संजय कंचर्लावार, संदीप आवारी, अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, तुषार सोम, छबू वैरागडे, मनोज पाल, राहुल घोटेकर, मंडळ अध्यक्ष रवी गुरुन्नूले, प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, सुभाष अदमाने, ॲड. सारिका सिंदुरकर, विनोद खेवले, रवींद्र गुरुनुरे, आशिष मासिरकर, संजय तिवारी, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदींची उपस्थिती होती.
पक्षाचे काम अधिक गतिशील करण्याच्या हेतूने आमदार किशोर जोरगेवार यांच्या वातीने नवनियुक्त पाच मंडळ अध्यक्षांना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संगणक व प्रिंटरचे वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नवनियुक्त पदाधिकारी आणि संचालकांचा सत्कारही मंत्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना मंत्री भोसले म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशातील सर्वमान्य नेतृत्व आहे. पक्ष संकटात असतानाही राज्यासह इतर राज्यातील निवडणुकांमध्ये त्यांनी नियोजनबद्ध काम करत सत्ता मिळवून दिली आहे. राज्यातील प्रत्येक घटकांचे प्रश्न समजून घेणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर आहे.
आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले असून त्याद्वारे त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास दर्शविण्यात आला. पक्षनिष्ठा, सातत्य, प्रामाणिकपणा हे गुण फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करत स्वराज्याची स्थापना केली. राज्य सरकारही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी स्नेहसंबंध असल्यामुळे चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाकाली मंदिर यंत्रा परिसर, दीक्षाभूमी विकास, धानोरा बॅरेज, टायगर सफारी यांसारखे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. आमच्या विभागामार्फत या व भविष्यातील सर्व विकासकामांना प्राधान्याने मंजुरी दिली जाईल, असेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले जनसेवेचे भान असणारे राजे – आ. किशोर जोरगेवार
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त आपण ४०० हून अधिक विविध सामाजिक, धार्मिक, आरोग्यवर्धक व शैक्षणिक कार्यक्रम राबवित आहोत. आज मंत्री भोसले यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. मंत्री म्हणून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात ते नेहमी तत्पर राहतात. त्यामुळे ते जनसेवेचे भान असणारे राजे आहेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आज पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनसेवेचा संकल्प केला आहे. रक्तदानाच्या माध्यमातून मागील सहा दिवसांत २ हजारहून अधिक रक्त युनिट्स संकलित करण्यात आले आहे. ही कार्यकर्त्यांची समर्पणशील भावना दर्शवते. या सप्ताहाच्या माध्यमातून शेवटच्या गरजूंपर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे.
विद्यार्थिनींना सायकल वाटप असो वा भव्य आरोग्य शिबिर – हे सर्व आयोजन थेट नागरिकांच्या हिताचे आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथील विकासकामांना प्राधान्य द्यावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
मंत्री भोसले यांचे चंद्रपूर आगमन झाल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माता महाकाली मंदिरात दर्शन घेतले. भिवापूर वार्डातील राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाचेही त्यांनी दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आणि बालाजी सभागृहातील रक्तदान शिबिराचे उद्घाटनही त्यांनी केले. या शिबिरात २०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले.