देऊळगाव राजा तालुका शिवसेना प्रमुख पदी सुदाम काकड तर उपजिल्हा प्रमुख पदी दिनकर खरात यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका शिवसेना (शिंदे गट ) प्रमुख पदी सुदाम मोकिंदा काकड यांची तर उप जिल्हा प्रमुख पदी दिनकर शामराव खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचे प्रमुख तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्या शिफारशीनुसार शिवसेनेचेसचिव संजय मोरे यांनी सदर नियुक्त्या केल्या आहेत.
नवनियुक्त तालुका प्रमुख सुदाम काकड व जिल्हा उप प्रमुख दिनकर खरात यांचे बस स्थानक चौकात शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख गोपाल व्यास, विजुभाऊ उपाध्ये,, मोरेश्वर मिनासे, जगदीश कापसे, विवेक खेडेकर, नंदन खेडेकर, सलीम पठाण, अजय दीडहाते, अतिश खरात, सचिन व्यास, राजेश सपाटे, तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते.