ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानसिक आजारी महिलेला पोलिसांची वेळेवर मदत

कुटुंबियांच्या ताब्यात सुखरूप सोपवले

चांदा ब्लास्ट

दि. 25 जुलै 2025 रोजी म्हातारदेवी रोडवर रात्रीच्या सुमारास फिरत असलेल्या एका मानसिक रुग्ण महिलेला घुग्घुस पोलिसांनी वेळीच मदत करून तिचे प्राण वाचवले. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिच्या सुरक्षिततेची काळजी घेतली.

महिलेला तत्काळ चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्या मानसिक स्थितीचा विचार करून तिला आवश्यक वैद्यकीय मदत मिळवून देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि थोड्याच वेळात तिच्या नातेवाईकांचा शोध लावण्यात यश मिळाले. योग्य ओळख पटवून आणि संपूर्ण कार्यवाही पूर्ण केल्यानंतर महिलेला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

ही संपूर्ण संवेदनशील कारवाई घुग्घुसचे API सचिन तायवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये महिला पोलीस शिपाई अश्विनी मालेकर, पोलीस शिपाई पवन डाखरे, मंगेश हिवरकर, कमल राठोड आणि विजय ढपकास यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे महिलेला वेळेवर मदत मिळाली आणि ती सुखरूप घरी परत जाऊ शकली.

या प्रकारातून घुग्घुस पोलिसांनी पुन्हा एकदा मानवी संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये