ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वसंत बहार पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

संत्रा नगरी नागपूर मध्ये कु. दिपाली व कु. अंजली राठोड अवघ्या १३ व १६ वर्ष वयात जैविकशेती, आरोग्याच्या समस्या,कारणे व उपाययोजनेवरील उपयोगी, माहीतीपूर्ण यशस्वी प्रयोगानंतर लिहीण्यात आलेल्या वसंत बहार पुस्तकाचे प्रकाशन झाले.. सुप्रसिद्ध कृषि शास्त्रज्ञ व ऍग्रो व्हिजनचे मुख्य सल्लागार मा.डॉ.सी.डी.मायी सर यांच्या शुभहस्ते समग्र क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची प्रतिमा पुजन व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे अप्पर आयुक्त (विकास) मा.कमलकिशोर फुटाणे, मा.दिगांबर चव्हाण आदिवासी उपायुक्त,नागपूर यांचीही विशेष उपस्थिती होती.डॉ. प्रवीण कुमार वुतला, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, क्षेत्रीय जैविक एवं प्राकृतिक खेती केंद्र, नागपुर, कृषि एवं किसान कल्याण विभाग, भारत सरकार यांचीही उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर नगरीचे नायक मा.आत्माराम चव्हाण,कारभारी मा.अॅड.बद्रीप्रसाद चव्हाण होते. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय इंग्रजी लेखक व समिक्षक ज्यांनी वसंत बहार या पुस्तकाची प्रस्तावना लिहीली ते मा.दिनेश सेवा राठोड आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान देणारे पारशिवनीचे क्रियाशिल संवर्ग विकास अधिकारी मा.सुभाष जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी श्रीपतभाऊ राठोड द्वारा बालक आणि पालक यांना केंद्रस्थानी ठेवून लिहीलेल्या आमची शाळा व पालकांसाठी क्रांतीगीत या दोन गीतांचे भिंतीपत्र प्रकाशित करण्यात आले.आणि सत्यक्रांती या १०१ क्रांतीकारी कविता संग्रहाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. सर्वच मान्यवरांद्वारा परसबाग निर्मिती व पुस्तकांच्या लेखन उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. विशेष म्हणजे सर्वच शाळामध्ये वसंत बहार हे पुस्तक पोहचले पाहीजे यासाठी शिक्षण विभागांच्या वरिष्ठ अधिकांऱ्यासोबत चर्चा करण्याचे मनोगत अप्पर आयुक्त (विकास) मा. कमलकिशोर फुटाणे यांनी आवर्जून प्रतिपादन केले.

याप्रसंगी बाल लेखिका कु. दिपाली व कु. अंजली श्रीपत राठोड यांचे इंग्रजी व हिंदी भाषेतील मनोगत त्याचप्रमाणे सत्यक्रांतीचे लेखक श्रीपतभाऊ राठोड यांचे विचार आणि क्रांतीकारी कवितांचे सादरीकरण झाले.कार्यक्रमाचे सुत्र संचलन सौ. जयश्रीताई श्रीयत राठोड केले आणि परसबाग निर्मिती हे गीत सादर केले. तर आभार कु. दिपाली राठोड यांनी मानले.

क्रार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर समाजबांधवाची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुंदन शेरे,मनोज राठोड,पिरूसिंग राठोड,सुदाम राठोड,धर्मेंद जाधव,पुजा सुर्यवंशी व पारशिवनीच्या सर्व कृषि सखींनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये