वरोरा येथे विविध सामाजिक संघटने तर्फे डॉ. अब्दुल कलाम यांना आदरांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने
भारतीय क्षेपणास्त्राचे प्रणेते, भारताचे ११ वे राष्ट्रपती, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. अवुल पकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांच्या १० व्या स्मृतिदिनी त्यांना विविध सामाजिक संघटने तर्फे येथील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम चौकात आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुंज मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे हे होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.ए पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा न.प.चे माजी बांधकाम सभापती शेख जैरुद्दीन छोटुभाई, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.श्याम लेडे, नागपूर विभागीय सचिव राजेंद्र मुंगले, न.प.माजी उपाध्यक्ष अनिल झोंटींग, सीडीसीसी बँकेचे माजी संचालक वसंतराव विधाते, जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तथा माजी मुख्याध्यापक लक्ष्मणराव पराते, जय हिंद सैनिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मर्दाने, पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार,,माजी ग्रामसेवक गोविंदराव कोहपरे, आरपीआय नेते दशरथ शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात गमे म्हणाले की, डॉ. अब्दुल कलाम यांचे विचार युवापिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. छोटुभाई यांच्या पुढाकाराने विविध संघटनेच्या माध्यमातून डॉ. कलाम चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन खरंच कौतुकास्पद आहे.
सुरुवातीला डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली तदवतच् दौन मिनट मौन धारण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन छोटुभाई शेख यांनी केले.
याप्रसंगी माजी नगरसेवक सनी गुप्ता, सामाजिक कार्यकर्ता गोपाळ धोटे, पत्रकार विनोद शर्मा, सहाय्यक फौजदार विजय चिकणकर, पोलीस हवालदार पुरुषोत्तम रामटेके, सचिन कुमरे, पारखी गुरुजी, मकसूद भाई शेख,आदर्श भोयर,बिट्टू श्रीराम आदीसह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.