ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरातील ऑटोरिक्षा चालकास १५ ऑगस्टला दुपारी ३ वा. नविन खाकी ड्रेसचे वाटप

पालकमंत्री चंद्रपूर जिल्‍हा मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते वितरीत होणार खाकी ड्रेस

चांदा ब्लास्ट

महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालकमालक संघटनेच्‍या वतीने १५ ऑगस्‍ट भारतीय स्‍वातंत्र्याचा ७६ वा वर्धापणदीनानिमित्‍याचे औचित्‍य साधून चंद्रपूर शहरातील ऑटोरिक्षा चालकांमध्‍ये शिस्‍थीचे स्‍वरुप निर्माण करण्‍याच्‍या उद्देशाने चंद्रपूर शहरातील ऑटोरिक्षा चालकास नविन खाकी ड्रेसचे वाटप दि. १५ ऑगस्‍ट २०२३ रोजी दुपारी ०३.०० वा. ना. मुनगंटीवार यांच्‍या जनसंपर्क कार्यालय चंद्रपूर येथे वितरीत करण्‍यात येणार आहे.

कार्यक्रमाला महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व पालकमंत्री चंद्रपूर जिल्‍हा मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते वितरीत होणार आहे. महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालकमालक संघटनेकडे ज्‍या ऑटोरिक्षा चालकांनी नावे नोंदविली आहे. अशा सर्व ऑटोरिक्षा चालकांस नविन खाकी ड्रेसचे स्‍वतंत्र्यदीनी या कार्यक्रमाला संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊत, जिल्‍हा सचिव सुनिल धंदरे, सहसचिव कुंदन रायपुरे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष जहीर शेख, जाकीर शेख, संघटन प्रमुख विनोद चन्‍ने यांची प्रामुख्‍याने उपस्थिती राहणार आहे.

तरी चंद्रपूर शहरातील सर्व ऑटोरिक्षा चालकांनी व पदाधिका-यांनी कार्यक्रम यशस्‍वी करण्‍याकरिता उपस्थित रहावे, असे आवाहन कोषाध्‍यक्ष रवी आंबटकर, महेश ढेकरे, प्रसिध्‍दी प्रमुख राजू मोहूर्ल, रमेश वझे, किशोर वाटेकर,विलास बावणे, मोहन निंदेकर, प्रकाश पात्रा, मुशिर शेख, खुशाल साखरकर, मंगेश चवरे, कुंदन कटारे, नरेंद्र येनुरकर, एजाज शेख, अंकुश कौराते, वासुदेव कुबडे, राजु अलगुनवार,  अनिल मिसाळ, प्रशांत वानखेडे, जनार्धन गुंजेकर, रमेश मुन, दिलिप कलोडे, विनोद कुळमेथे, बाळू डंबारे, वहीद शेख, बंडू किरणकर, सचिन बांगडे, किरण मस्‍कावार, राजू गजर, योगेंद्र देशभ्रतार, अजय मिसे, विजय मडावी, बाळू मेश्राम, राशिद शेख, साहीद शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये