ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ख्रिस्तानंद विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची स्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- स्थानिक ख्रिस्तानंद स्कुल अँड ज्युनिअर काँलेज ब्रम्हपुरी येथे नुकतेच शालेय मंत्रिमंडळाचे पदग्रहन सोहळा आयोजित करण्यात आला.

    यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणुन नगरपरीषद ब्रम्हपुरीच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिस्टर पावना,उपमुख्याध्यपिका सिस्टर अंजली,फादर क्रिस्टो प्रामुख्याने उपस्थित होते विद्यालयात वर्षभरात विविध उपक्रम,स्पर्धा,सांस्कृतिक तसेच शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जात असतात त्यासाठी विविध समित्यांचे प्रमुख नियुक्त केले जातात.यावर्षी सुद्धा विविध समित्यांचे गठण करण्यात आले.

त्यामध्ये शाळा प्रमुख अजिंक्य आत्राम व रुतुजा राहाटे ,शिस्तबद्धता प्रमुख प्रध्नेश मुनघाटे व याशिका मुलमुले,क्रिडा प्रमुख चिरायु दोनाडकर याची निवड करण्यात आली.तसेच रेड ग्रुप प्रमुख ओंकार दिघोरे व गित ठाकरे,येलो ग्रुप प्रमुख दिव्यम ठाकरे व नंदिनी गुरनुले ,ग्रिन ग्रुप प्रमुख धवल राऊत व ग्रिसा शेंडे, ब्लु ग्रुप प्रमुख ईराजकुमार झाडे व आभा भागडकर,सांस्कृतिक प्रमुख गाैरव तोंडरे व वेदिका रामटेके,भाषा प्रमुख अक्षांत मेश्राम व संम्सरा नगराळे,गणित प्रमुख अभिज्ञा टेंभुर्णे व वैष्णवी मुळनकर,विज्ञान प्रमुख प्रथमेश वानखेडे व श्रद्धा राठी,सामाजिक शास्त्र प्रमुख दिप पटेल व आफ्रिन शेख यांची निवड करण्यात आली.

         कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी न.प.च्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच दहावी व बाराविच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख,प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देवुन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये