ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निराधार दाम्पत्यांना काँग्रेसचा मदतीचा हात ; एक महिन्याचे रेशन देऊन केली मदत

DBT पोर्टलमुळे निराधार बांधवांवर उपासमारीची वेळ ; 31 हजार लाडक्या बहिणीचे अर्ज बाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील अनेक गावातील निराधार वयोवृद्ध दिव्यांग बांधवांचे डी बी टी नसल्यामुळे 6 महिन्यापासून मानधन रखडले असल्याने निराधारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

       विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मोठ-मोठी आश्वासने जनतेला दिली आणि लाडकी बहीण योजना सुरू करून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये सुरू केले असल्याने निराधार बांधवाकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे डी बी टी पोर्टलमुळे मागील सहा महिन्यांपासून निराधार बांधवांना पैसे मिळाले नाही तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील 31 हजार महिलांचे अर्ज बाद केल्याने महिलांमध्ये व निराधार बांधवांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

               लाडक्या बहिणीमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडल्याने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजनेला मात्र ग्रहण लागले आहे निराधार वयोवृद्ध लोकांना त्यांच्या हक्काचे पैसे मागील सहा महिन्यापासून त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही. आता असेच वयोवृद्ध लोक जे अतिशय गरीब आहेत त्यांना कुणाचा आधार नाही अश्या निराधार बांधावर उपासमारीची वेळ आली आहे.

         गडचांदूर येथील गाडगेबाबा नगरमध्ये वास्तव्यास असलेले हाफिजा बेग आणि कासम बेग हे दोघेही दांपत्य 80 वर्षा पलीकडे त्यांचं वय असून अत्यंत गरीब दांपत्य आहे त्यांच्याकडे पोट भरण्याकरिता अन्नाचा एकही दाणा नव्हता याबाबत माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर यांना माहिती मिळताच त्यांनी एक महिन्याचे रेशन त्यांच्या घरी नेऊन दिले आणि लवकरच अशा वयोवृद्धांकरीता जोपर्यंत त्यांचे हक्काचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही आणि लवकरच अशा निराधार लोकांना घेऊ तहसील कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे सांगितले यावेळी माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर विवेक येरणे, पुरुषोत्तम मेश्राम सुरज गोंडे प्रवीण मेश्राम, इंदर कश्यप आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

           गडचांदुर येथील बेग दांपत्यावर उपासमारीची पाळी आल्याची माहिती मिळताच त्यांना एका महिन्याचे रेशन घेऊन दिले व इतरही गरजूंना मदत करणार आहों तालुक्यातील निराधार बांधवांना जो पर्यंत हक्काचे पैसे मिळणार नाही तो पर्यंत स्वस्थ बसणार नाही.

               सचिन भोयर.

   माजी उपनगराध्यक्ष गडचांदूर

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये