ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर पालगाव बस सेवा पूर्ववत सुरू करा

एकता युवा मंचची मागणी _ आंदोलनाचा इशारा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्य जाण्यासाठी व परत येण्यासाठी सुरू असलेली पालगाव बससेवा कोरोनामुळे बंद झाली होती आधी सायंकाळची 7 वाजताची चंद्रपूर पालगाव ही बस फेरी उपलब्ध असायची ती बस फेरी बंद झाल्याने या परिसरातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

औद्योगिक नगरी असलेल्या नांदा शहराला लागून असलेल्या पालगाव गावाला मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेली चंद्रपूर पालगाव सायंकाळी 7 वाजता व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घरी परतण्यासाठी गडचांदूर पालगाव दुपारी 12 वाजता बससेवा सुरू करून पालगाव परिसरातील विद्यार्थ्यांची व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी.

तसेच विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समस्या संदर्भात राजुरा आगार प्रमुखांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना बसच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली मागणी पूर्ण न झाल्यास एकता युवा मंच पालगाव तर्फे रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.यावेळी गौतम खोब्रागडे अविनाश मडावी श्रुती सरवर पल्लवी टेकाम वंशिका मडावी एकता युवा मंचचे पदाधिकारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये