काक्रीट मिक्सरला तारांचे स्पर्शाने २२वर्षीय मजुराचा मृत्यू
ठेकेदारावर गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई द्या _ वडिलांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली अरब येथे घरकुलाचे काम हितेश सतीबावने ठेकेदार करीत असताना त्यावर ईश्वर मुखरु झाडे वय २२वर्ष हा मजूर म्हणून कामाला गेला होता. रस्त्यात मिक्सर मशीन मागेपुढे घेत असताना शेजारी असलेल्या विद्युत तारांचा स्पर्श लागल्याने संपूर्ण काक्रीट मशीनला विद्युत पुरवठा झाल्याने सर्वांना त्याचा झटका बसला.
मात्र याचे पायात चपला नसल्याने त्याला विद्युत शॉक लागल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले असता वडील नामे मुखरु बिजाराम झाडे यांनी नागभीड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. पपिंद्र महादेव भोयर मांगली अरब यांचे घरासमोरील मिक्सर मशीन मागेपुढे करीत असताना इलेक्ट्रिक केबल तुटल्याने मरण पावल्याने ठेकेदार हितेश सतीबावने यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबाची मोठी हानी झाली आहे सदरची घटना काल सकाळी नऊ वाजता झाल्याचे कळते.
सदर घटना निष्काळजीपने झाल्याने माझ्या मुलाचे मरणास कारणीभूत ठरल्याने योग्य कार्यवाही मला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.