शिवसेना उबाठाचे चंद्रपूर जिल्ह्यापद विकने आहे
मला नाही अब्रू मी कशाला घाबरू : त्या बैनरमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वरोरा-भद्रावती शहरात लावण्यात आलेल्या त्या बॅनरमुळे जिल्हा राजकारणात खळबळ माजली आहे. या बॅनरद्वारे थेट आरोप करताना म्हटले आहे की, “शिवसेना उबाठा गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख पद विकणे आहे. किंमत – 10 ते 25 लाख. संपर्क – राऊत. मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू!”
या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून,संशयाची सुई माजी जिल्हा पदाधिकारी मुकेश जिवतोडे यांचेकडे फिरत असल्याचे चर्चेतुन दिसुन येत आहे. जिवतोडे यांनी काही महिन्यांपूर्वी उबाठा गटातील गटबाजी, पद विक्री व विधानसभा तिकीटांसाठी होत असलेल्या पैशांच्या व्यवहारामुळे नाराजी व्यक्त करून शिंदे गटात प्रवेश केला होता.
मुकेश जिवतोडे यांनी 2024 मध्ये वरोरा-भद्रावती विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवून तब्बल 50 हजार मते मिळवली होती. ते या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते, तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यांच्या या प्रभावी लढतीने महाविकास आघाडीचे संपूर्ण समीकरण कोलमडले होते.
याआधी देखील शिवसेना (उबाठा गट) चे कार्यकर्ते राऊत यांच्यावर पद विक्रीचे आरोप करत होते. मात्र, यावेळी थेट बॅनरद्वारे हे आरोप उघडपणे जनतेसमोर मांडण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा संशयाचा आणि बदनामीचा काळा फास लागला आहे.
या बॅनरमुळे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. राऊत आणि त्यांच्या गटाकडून या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी राजकीय वर्तुळात या प्रकारामुळे मोठा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.