आ.सुधीर मुनगंटीवार यांचा भद्रावती तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हक्कासाठी ठाम पाठपुरावा
मुंबईत विधान भवनात पार पडली अरबिंदो कंपनी संदर्भात महत्त्वाची बैठक

चांदा ब्लास्ट
उद्योग मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या संदर्भात ठोस निर्णय
आ. मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कायम आघाडीवर
मुंबई : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी असलेली धडपड पुन्हा एकदा बघायला मिळाली. भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. संदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना मान्यता देत विविध ठोस निर्णय घेण्यात आले.
भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनी संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत उद्योग मंत्री श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक पार पडली. शेतकरी आणि कंपनी यांच्यातील संघर्षासह विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. मंत्री सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेत स्पष्ट निर्देश दिले.
जमीन अधिग्रहणासाठी ठोस कालमर्यादा निश्चित करणे, अधिग्रहण करताना नुकसानभरपाईची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर राहील, रोजगारात स्थानिकांना ८०% प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पुढील अधिवेशनापर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास कंपनीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला प्रमूख उपस्थिती आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, विभागाचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे झालेले निर्णय –
– सदरील बैठकीत १२५ एकर शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून यासंदर्भात शेतकरी व आमदार महोदयांसमवेत चर्चा करून उर्वरित समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना उद्योग मंत्री यांचे निर्देश
– ३७५ एकर जमीन सप्टेंबरपर्यंत खरेदी करणार व उर्वरित ३७५ एकर जमीन डिसेंबर पर्यंत तीन टप्प्यात खरेदी करणार
– माजी सैनिकांचा विषय व्यक्तिशः बोलून मार्ग काढण्यात येईल
– सुरक्षा रक्षक स्थानिकच भरले पाहिजेत याबाबतचे आदेश मंत्री महोदयांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिले
– सुरक्षा रक्षक भरतीसाठी कंपनी प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र देणे व मागणी करणे
– जमीन खरेदी करताना झाडे, बोरवेल आदींची नुकसान भरपाई कंपनी प्रशासनाने दिली पाहिजे असे आदेश मंत्री उदय सामंत यांनी अरबिंदो रियालिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले.