ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीतेज प्रतिष्टान मार्फत गडचांदुर येथे वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- माणिकगड पायथ्याशी वसलेल्या गडचांदुर नगराला डोंगररांगांनी वेढलेले आहे.परंतु सिमेंट कंपन्याच्या वायु प्रदुषणामुळे परिसरात दुषीत वातावरण निर्माण झाले आहेत.परिणामत: नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त असलेल्या झाडांची दिवसेंदिवस अगणित वृक्षतोड होते आहे.हीच बाब अधोरेखित करून श्रीतेज प्रतिष्टान गढचांदुर च्या स्वयंसेवकांनी वृक्ष लागवड करून वृक्षसंवर्धन करण्याचे पाऊल उचलले आहे.

येणाऱ्या काळात संपुर्ण नगरात ५ हजार वृक्ष लागवड करून नगराला नैसर्गिक रूप प्रदान करण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प आहे.

त्यासाठी शहरातील तरूण,जेष्ठ नागरिक,महिला वर्ग सज्ज झालेला आहे.नुकतेच शासकीय विश्रामगृह व पोलिस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षलागवड करतांना प्रत्येक झाडांची जोपासना करणेसाठी स्थानिक व्यक्तिला त्या झाडाचे दायित्व दिलेले आहे.

यावेळी श्रीतेज प्रतिष्टान गडचांदुर चे अध्यक्ष निलेश ताजणे,रमाकांत कोमावार, शामराव उरकुंडे,सतिश ठाकरे, चिंतामणी आगलावे,किर्तिमाला आगलावे,डॉ.शैलेश विरूटकर, कोषाध्यक्ष हरिहर खरवडे गुरूजी,संस्थेचे सचिव संतोष मोतेवाड,सतिश ठाकरे,बाबाराव खापणे,वामन कोंडेकर,आप्पलवारजी,कृष्णा भागवत,रमेश बोंद्रे, गणेश ठावरी,शंकर ठावरी,कोंडेकर ताई, मोहम्मद रहिम शेख,नितेश खापणे,चंद्रशेखर सातपुते,रविंद्र दुरटकर,एप्पलवार गुरूजी,सागर उत्तरवार,सतेंदर सिंह,रमेश बोंद्रे,दिलीप तिखट,गणेश ठावरी, शंकर ठावरी, शेखर बांद्रे,सचिन गोहोकर,प्रतिक भागवत,कार्तिक ठाकरे,शुभम सातपुते,अमोल वडस्कर,प्रणय भोयर,रवी दुरूटकर,शुभम पांडे, मोहम्मद अश्रफ शेख, मोहम्मद इरफान शेख,आगलावे मैडम, वंदनाताई मोरे,श्रीतेज प्रतिष्ठान चे कुणाल पारखी,सुयोग कोंगरे,मयुर पोटदुखे,मिथुन देवकर,नवनाथ मंदे, गणेश कवलकर,अजिम बेग,महाविर खटोड आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये