गडचांदूर राजुरा महामार्गावरील कुकुडसाथ फाट्यावर पाणपोईचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कुकुडसाथ येथील युवा सामाजिक कार्यकर्ते आणि अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे चंद्रपूर युवा जिल्हाध्यक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोरपना तालुका संघटक चंपतभाऊ राजुरकर आणि त्यांच्या सहकारी मित्रमंडळी यांच्या माध्यमातून राजुरा- आदिलाबाद महामार्गावर हरदोना बुद्रुक येथील बसस्थानकाजवळ कुकुडसाथ फाट्यावर पोणपोईची सुरूवात करण्यात आली.
मौजा हरदोना (बुद्रुक) तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील हापसा ( हातपंप ) महामार्ग बनवताना काढण्यात आला होता. उन्हाळ्यातील तीव्रता लक्षात घेऊन हरदोना (बुद्रुक) आणि कुकुडसाथ फाट्यावरील बस थांब्यावर पाण्याची आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे तात्पुरत्या स्वरूपातील निवाऱ्याची अत्यंत आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेऊन चंपतभाऊ राजुरकर यांनी येथे काहीकाळ थांबणाऱ्या वाटसरू आणि प्रवासी लोकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
सदर पाणपोईचे उद्घाटन अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांच्या अध्यक्षतेखाली युवा जिल्हाध्यक्ष चंपतभाऊ राजुरकर यांनी केले. यावेळी कुकुडसाथ आणि हरदोना बुद्रुक तसेच या परिसरातील वाहन चालक कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि चंपतभाऊ राजुरकर यांचे सहकारी मित्रमंडळी अनैशा वाहन चालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सुरजभाऊ उपरे,चंपत राजूरकर चंद्रपूर युवा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर,आकाश ताकसांडे,निखिल चवले,संकेत कटाईत, अतुल पिंपळकर, समीर भोयर, सुरज सोयाम, अजय सोयाम, रोहित जवंजाळ, आकाश ताजने, अनिल डोंगे, सौरभ आत्राम, पवन निमकर, अजय आत्राम, प्रज्वल लखमापूर, बादल टेकाम, मनोहर सोयाम, मारुती तुर्के, ऋषभ कटाईत, अनिकेत वांढरे, दीपक सोनटक्के, एकनाथ वांढरे, विकी आत्राम, रमेश बावणे, श्रीकांत आत्राम, प्रवीण कुंभे, सुभाष लखमापूर, दिगू कोदंवार, अनमोल निब्रड, सूर्यभान निर, लहू पोतले, अमोल मेश्राम, दीपक कोडापे, प्रेमदास मेश्राम, अविनाश कुडमेथे, प्रशांत हस्ते, करण मंडली, अविनाश उपरे, विजय मेश्राम, शंकर कुंबरे, रवी कोडापे, निखिल गेडाम, गुरुदास सिडाम, आलेख निर, अभिषेक गोरे, दिलीप ताजने, अनुप चवले, नंदकिशोर वडस्कर, देविदास ताजणे, गणेश वडस्कर, निलेश वाढई, सागर मेश्राम, विजय बुरकुटे, अक्षय आत्राम, विकेश आत्राम, रंजीत दुर्योधन, आशुतोष निब्रड इत्यादींनी सहकार्य केले.



