ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“रमजानचा महिना हा शिस्त आणि समर्पणाचे प्रतीक : खा. धानोरकर

जनता कॉलेज व बागडखिडकी परिसरात उत्साहाचे वातावरण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ पवित्र रमजान महिन्याच्या महिनाभराच्या खडतर उपासनेनंतर (रोजा) येणारा ईद-उल-फितर हा सण संयम, त्याग आणि मानवतेची मोलाची शिकवण देणारा सण आहे. या मंगलमयी पर्वाचे औचित्य साधून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शहरातील मुस्लिम बांधवांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आज ईदच्या पवित्र दिनी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनता कॉलेज परिसर आणि बागडखिडकी परिसरातील मुस्लिम बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या सुख-दुःखाची विचारपूस करत परिसरात सामाजिक एकोप्याचा संदेश दिला.

या सदिच्छा भेटीदरम्यान आमदार किशोर जोरगेवार,शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेविका सहिदा शेख, नगरसेवक अजय बल्की, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक सुरेंद्र अडबाले, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, रमजान अली, अजय महाडोळे, स्वप्नील कांबळे, शहजाद अहमद यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 यावेळी भावना व्यक्त करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “रमजानचा महिना हा शिस्त, समर्पण आणि प्रार्थनेचे प्रतीक आहे. ईदचा हा सण समाजात प्रेम, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करतो. ईदच्या या शुभदिनी आपणा सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि प्रगतीचे नवे पर्व सुरू होवो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.”

या भेटीदरम्यान परिसरातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, युवक आणि मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनता उपस्थित होती. आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीने प्रत्यक्ष दारी येऊन शुभेच्छा दिल्याने मुस्लिम बांधवांनी खासदार प्रतिभा धानोरकर व उपस्थित मान्यवरांचे मनापासून आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये