ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रमजान ईद : बंधुभाव, एकता आणि मानवतेचा प्रेरणादायी संदेश – आ. जोरगेवार

रमजान ईद निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट

रमजान ईद हा सण केवळ आनंदाचा उत्सव नाही, तर तो संयम, त्याग, प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी सण आहे. संपूर्ण रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा, प्रार्थना आणि आत्मशुद्धीच्या माध्यमातून आपल्या जीवनात शिस्त, संयम आणि श्रद्धा जोपासतात. त्यामुळे रमजान ईद हा बंधुभाव, एकता आणि मानवतेचा प्रेरणादायी संदेश देणारा सण असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

रमजान ईद निमित्त लष्करी ईदगाह, पठाणपूरा ईदगाह आणि गुप्त शाही मस्जिद येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. या प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर, बलराम डोडानी, राशिद हुसेन, तुषार सोम, मंगेश अहिरकर यांचीही उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, धर्म वेगवेगळे असले तरी आपल्या भावना, आपली माणुसकी आणि एकमेकांप्रती असलेला आदर हा समान आहे. आपल्या देशाची खरी ओळख ही ‘विविधतेत एकता’ अशी आहे. हिंदू, मुस्लिम, सिख, ख्रिश्चन अशा सर्व धर्मांचे लोक एकत्र राहून सण-उत्सव साजरे करतात, हीच आपल्या भारताची मोठी ताकद आहे.

समाजात कोणीही एकटा किंवा वंचित राहू नये. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणे, गरजूंना मदतीचा हात देणे आणि समाजात प्रेम व सौहार्द निर्माण करणे हीच खरी ईद आहे. आजच्या काळात समाजात सौहार्द आणि एकोपा टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. आपले चंद्रपूर शहर हे नेहमीच शांतता, एकात्मता आणि सामाजिक सलोखा जपणारे शहर राहिले आहे आणि पुढेही ही परंपरा कायम राहील, असा मला विश्वास आहे, असे ते यावेळी म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये