ऑटोरिक्षा संघटनेतर्फे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेतर्फे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती की, राज्यातील ऑटोरिक्षांची संख्या जास्त प्रमाणात झाले आहे. लोकसंख्येनुसार ऑटोरिक्षा परमिट देण्यात यावे.
ही मागणी घेवुन मागील दोन तीन वर्षापासून आमदार मुनगंटीवारांना संतत आठवण करुन देत असत. त्यामुळे आमदार मुनगंटीवार यांनी चालु असलेल्या विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न लावुन धरला व परिवहन मंत्री यांनी आमदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यातील ऑटोरिक्षा नविन परवाने देण्यात बंद करण्याचे जाहीर केले. त्यामुळे बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्र राज्यातील ऑटोरिक्षा चालकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे. त्या प्रसंगी स्वागत करताना महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनिल धंदरे, उपाध्यक्ष विनोद चन्ने, किशोर वाटेकर, रवी आंबटकर, कुंदर रायपुरे, भैयाजी मोहुर्ले, अंकुश कौरासे, बंडू भगत, रमेश वझे, विलास बावणे, मंगेश चवरे, कुशाल साखरकर, शंकर थोरात, विजय बावणे, जहीर शेख, जाकीर शेख व असंख्य ऑटोरिक्षा चालक मालक यांनी आभार व्यक्त केले व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे शाल श्रीफळ देवुन स्वागत केले.



