ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना दोन पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दैनिक लोकसत्ताच्या जिल्हा निर्देशांकात वर्धा जिल्ह्याला दोन पुरस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते जिल्ह्याच्या या उत्कृष्ट कामासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचा पुरस्कार देऊन गौरव.

जिल्हा विकास निर्देशांक गट ३ वर आधारीत जिल्हानिहाय क्रमवारीमध्ये सन २०२४-२५ या कालावधीत लक्षणीय प्रगती तसेच सन २०२६ मध्ये इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत सुक्ष्म, लघु आणि मध्यम विभागामध्ये महिलाचलीत उद्योगाचे सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा अशा दोन बाबींसाठी पुरस्काराचा समावेश.



