अन्नाभाऊ साठे विद्यालय कुंभेझरी येथे गुरू गौरव कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- गुरू या शब्दाचे उच्चारण करताच आदराची भावना जागृत होते.आपल्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मार्गदर्शन करणारे गुरूवर्य डोळ्यासमोर येतात.हिच बाब अधोरेखित करून अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम या सामाजिक संस्थेव्दारा भागात गुरू गौरव कार्यक्रम साजरा करण्यात येतो आहे.
कुंभेझरी येथिल कै.अन्नाभाऊ साठे विद्यालय येथे गुरू गौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
लोकशाहिर अन्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करूण तथा जिवती भागात शिक्षणाचा पाया रोवणारे स्वर्गीय निवृत्तीनाथ मोतेवाड यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करूण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक लोडे,अनुलोम चंद्रपूर उपविभाग प्रमुख सुनिल दालनकर,राजुरा भाग जनसेवक सतिश मुसळे, शाळेतील शिक्षक विनोद वाघमारे,दिलीप जिवने, महादेव अहिरकर,संकेत भगत, वैशाली नंदनवार,बी.आर.बुच्चे उपस्थित होते.
गुरू शिष्याची प्राचिन परंपरा सतिश मुसळे यांनी प्रास्ताविकात विशद केली.
आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातुन ज्ञानाचा प्रकाश देण्याचे मौलिक कार्य गुरू आपल्या ज्ञानार्जणात करीत असतात.गुरू हा आपल्या जीवनाला सकारात्मक आधार देण्यासाठी प्रयत्न करीत असतात.असे मत शाळेचे मुख्याध्यापक लोडे यांनी व्यक्त केले.
गुरू हा कुंभारा सारखा असतो.विद्यार्थी ज्ञानार्जनाचे कार्य त्यांच्या हातुन होऊन एकंदरीत व्यक्ती निर्माणाचे कार्य गुरू करीत असतो.आपल्या दैनंदिन जीवनात गुरुला अमुल्य स्थान आहे, म्हणुन गुरूंचा सदैव सन्मान करीत राहा.असे मत सुनिल दालनकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद वाघमारे यांनी केले.कार्यक्रमाला शाळेतील समस्त विद्यार्थी उपस्थित होते.